शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

शरदेचा चंद्र …..


            हा शरदेचा चंद्र,
उल्हासाची रात्र.
जगमगते तारे,
अवती-भोवती.
निरखून येई,
काळोखाची लतीमा
   रात्र-भुगांर गुंजारती,
   वेली-फुलीवर.
मदमोहती,शोभेवल्लभी;
चंद्र-गौरी वसे.
शशी भोवती
फाके ऊजाला ;
शृंगार करूनी,
रस-गंध निथळे.
अमृताचा भरला
भंडार,
सांडे-सांडे
जिथे-तिथे धरणीवर;
थेंब-थेंब रसाचे मळे.
प्राशन करी दुधहंडी;
संतुष्ट जाहली
मनाची ऋणी ,
हसी .....।।।।।। !!!!!!!!!!


     ......  ज्योती .