मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

मृगतृष्णा ..

कोकीळेची आर्त
ऐकूणी झाली
पावसाने झुंज ही घातली
तहानलेल्या वृक्षांनी
हात पसरूनी
आपली तृष्णाही भागविली
हरी-भरीत झाडा-फुलांनी
प्रेमाची साद ही घातली
पक्ष्यांच्या किल्लोळाने
प्रतिसाद ही दिली
पण; मी जाणुनही
अजाण झाले हे बघुनि,
जिकडे-तिकडे न्याहाळूनही,
मनाची खंत
कमी नाही झाली
विचारांच्या थैमानांनी
गल्लोळ घातली
कदाचित, माझ्या मनाचा
अवस्थेला,
प्रतिसादाची पूर्तता नाही मिळाली;
म्हणुनही, मनाची मृगतृष्णा
भागिली नाही
राहुनि-राहुनी मन मला विचारी,
तूला हवे तरी काय,
तूला हवे तरी काय.. ?..सखे …!
…. ज्योती