जीवन हे सुख-दुखाचे रहाट गाडे
दोन्ही चाकाच्या बैलगाडयासारखे
हे म्हणने ; शहाणपणाचे
जीवनचक्र हे चालत असती
येणारे क्षण जाणारे क्षण
आयुष्याचे क्षण हे मोजके
कधी सुखाचे तर कधी दुखाचे
याला धरावे तरी कसे
धरण्याचा प्रयत्नात झिजले
हे म्हणने ; किती शहाणपणाच
जीवन हे कधी रंजते तर कधी गंजते
याला मनोमनी करावे
हे जीवनाचे धागे-दोरे
कधी जुळले तर कधी तुटले
जुळविण्याच्या प्रयत्नात फसले
हे म्हणने ; किती शहाणपणाचे
जीवन हे चक्र सांगत ; गंमत-जंमत
म्हणती ; प्रयत्नात यश
बांधावे आपुले धैर्य
फळाची उमंग नसो ; कर्माची असावी जोड
पण ; या करण्याचा
प्रयत्नात
दैवच रुसले
हे म्हणने ; किती शहाणपणाचे ..... ??? …
..... ज्योती नागपूरकर .
