दिसले अवती-भवती
जाळ्यांचे गुरफटे
उकली विषाणाचे बंध
न सापडे मंज
गुंथ मागचे पूढचे
ऋण काटे मधोमध
दिवस जाती येती
वाट काढे प्रयत्नांती
रूसे उदासी मन
वारंवार छेडी,
भोवरयातली बेडी
थकुनि जाती हातचे पंजे
उरकुडी विचार ही गंजे
क्षीण होती भावनातले भाव
ओढी मोडी न सापडी नाव
आत्ताशा आला जीव,
आगोश्यात
मोडुनि सोडुनी गुंथाचा गुंथ
आशा दिसी भारांचा,
मनोपाश्यात .....
..... ज्योती
