शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

प्रेम दूत



राजाची ती राणी
राही उदासी
विठू रूखमाची ही जोडी
का नाही राजी
एकमेंकाशी विचारी
आम्ही का बिचारी
कधी रमती, गंमती जमती,
कधी एकदमच रूसती
एकमेंकाशिवाय न जगती
तरीही का झगडती
कारण न कळे त्यांसी
एकदा घडले,
कोणी अवतरले दाराशी
म्हणाले मी प्रेम दूत
प्रश्नांचा मारा देती त्यासी
विचारी आमच्यात कोण दोषी
गोँधळात त्यास सोडवी
त्याची वाणी म्हणी,
हि व्यथा तर घरोघरी
दिसे मला दारोदारी
जे भांडती, रूसती
हेच तर प्रेमाचे चहाळे असती
तूम्ही दोघं एक जीव
प्रेमाविणा, ना मिळे शीव .....

...ज्योती 

गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

इवले इवले बाळ तूझे ......


नाठाळ मदाळ,
अल्लडपणा भरी
हट्ट धरी जनी
राहवेना; विनाकूशी
रडवू-रडवून सोडी,
करी शिकवा त्या घडी
भासे देवपण; बोबड्या बोलातं
ओढी ती निरागस नजर
भरी घास ; इवलेसे हात
गुणगाण, कौतुकाचे होतं
बिलगुन ह्रदयास,
देती जणु भास
ही माया,
ममता उरी भरी
डोळ्यातील कडे,
आसवे भरी
रूसले मान हे माझे,
लपुन राही मनी
जन्मो-जन्मी,
भाग्य मिळावे असे
हे इवले; - इवले बाळ तूझे .....   ।।।।।

..... ज्योती


नाचे मोरनी



नाच नाचे ही मोरनी
या बागेची होवूनी राणी
लुभवती मनाला माझ्या
पिसारा आपला फुलवूनि
गोजिरवाणे रुप तिचे बघुनि;
लाजवी या रानपाखरांना
फुलवेलींना ही लळा लागे
हेवा वाटे क्षणा-क्षणाला
गानकोकीळा राग छेडत
थुई-थुई चा ठेका देत;
देती प्रतिसाद या क्रिडेला
या मनोरंजना चा खेळीत
हरपित माझे भान
आनंदी-आनंद झाले मिळून;
रोम-रोम हर्षित
नभ ही हिरमुसले,
बोलुनि ढगाला
धरणीवरची बघुनी ही माया,
आनंदाश्रु पडतील त्यावर
जणु;
आवर त्या छबीला …..!!!!!!!!!!!!!


!!!!! … ज्योती

मंगळवार, २० जानेवारी, २०१५

लेखणी ....



शीथील झाली
लेखणी माझी
रूसली; बिनसली
माझी ही मायी
हात भरी कंपन,
विषन्न उमळी मन
श्रद्धा माझी कूशी वळी
टिपले आसवे जरी,
खालीपण जागी असी
अनमोल ते क्षण,
आठवी काळीज गुण
जगाची रीती भाती,
न जाणी सत्व प्रिती
अंध-बेधुंद आस् असे
निरस वाटे हे जग सारे
न माने; न माने
जशी मती ; जशी निती ......।।।।। ....


.... .. ज्योती

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

जीवनसंग ……


भीरभिरती, गुंजारती
इकडून तिकडे संचारती
गगणाला विहारीत
रान-शेत न्याहाळीत
फूलांफूलांत मंडारीत
मदमस्त होतं
परागकणातं
हे जिवनाचे सोबती
मिळती जेव्हा
एकमेंकात
काना-कानाशी बोलीत
बघुनि त्यांचे नाठाळपण
मनोमन हसी
नजरेत वसी
अचानक ध्वनीत
हंबरडा फोडीत
दिसली गाय गोठ्यात
माझे लक्ष भेदी
नजरेला नजर भेडी
बघुनि तिची
लाघवी नजर
पाय वळे तिजकडे
भावनेनी घेरली
माजी माया
गोजांरीत हात पाठीवर
धीर येती मनी
असले हे
जीवनसंग
दिसे पदोपदी
अशीच ही रीत
बसे जगी ....... !!!
--- ज्योती





सोमवार, १२ जानेवारी, २०१५

एक इशारा …


राखीले तूझे माझे मन
मग हा दूरावा का येती
जपुनि हि तार ह्रदयाची
मग हे नेमके काय म्हणती
सांग, माझे मनी तूला
जगासी काय हवे
जे हवे ते मिळावे,
जे नको ते संपावे
का ! असे जीवन येती संग
सूर्यासारखे तेज मिळावे
चंद्रमाची शितलता,
पाण्याची निर्मळता अन्
फूलासारखी मोहक
पक्ष्यासारखं उडणं तर
पाखरांसारखं भिरभिरनं ही
मला त्या स्पर्शाचा,
त्या प्रेमाचा, त्या मायेचा
आस्वाद हवा
इशारा, एक हा
मिळवून द्यावा
जने, मनाला हा
दिलासा व्हावा …. ! …


….. ज्योती
चिमणां-चिमणींची सभा
ही भरली माझा दारी
आपसातली चेष्टा बोली
कूणी मधेच, चोचीने भरवि
तुटकी दाणी
प्रेम निथळी एकमेकांत
मला तर, जणु भासवी
जसे आम्ही किती गुणी
खरोखर, सात्विक-पारमार्थीक
इथेच आमची स्वर्गदारी
मद-मत्सर मोह अभाव
असी त्यांचा गुणी
एकमेंका-सहाय्य
घरटी वीणी, असे
ते मेहनतीचे धनी
निर्मल माया उतू भरी
दिसे त्या निरागस डोळी
भोळी-भाबडी त्यांची वाणी
एकमेंकासाठी जीवे भावी
पावि़ञ्य प्रेम संवेदनशील
मोल भरवी जगी .......,,,,,,,..... ।।।।।

.. .. ज्योती



... प्रेयसी ...


आशा-निराश भाव
मागती, प्रेमपाश जीव
पण, रूसती तिची आत्मसिख.
गहिवरले, भान हरपले
बघत निरज रिझले
भासवे जणु ह्रदयस्पर्श,
ओलावा हा स्नेहाचा
हातात हात घालतं
लाजवी प्रेमाचे ते बोलं,
भिडती जिवाला
संगत ही माझी-तूझी,
हवी ती जन्मोजन्मी
समुद्राच्या लहरी उसळती
मंद मंद सुवास भरती
हेरली ; मनाची हशी
शितल कंपन भरती,
हातमुठीत ;
वाढती ह्रदयाची गती,
मनाचा तोल बिगडती
श्वास-प्रश्वासाची ही घडी,
बिलगीत ; बाहोपाशी
निथळीत प्रेमगंध,
एक होतं ; बंधगाठ ....... ,......
... .. ज्योती नागपूरकर





भ्रांती मनातल्या …..


मनातल्या भ्रांती
विश्वास-अविश्वासाची गाठ
सुटता सुटेना
रूजते भिनते,
रूढी-नियती
कल्पना-विकल्पना रंजती
पंरपरेची पाडती छाप
व्यवहारी जनात ;
म्हणे याला,
शास्त्राची भरणी
देते , आदान-प्रदान
येती पिढ्यान्-पिढ्या
हे चक्र फिरती ;
पण न भरती
थकवा देती, सहनशिलता
परडा पडे हा भारी
जीवन-मृत्यू च्या
अडक्यात ........ ! ।।।।। ....



..... .. ज्योती 

निसटती क्षण …


नकारात्मकतेचे
पारडे भारी
प्रयत्नांती थकवा,
निज घेई रोज
साकार आत्मिक भरणा,
आस भरी पाणी
मी पणाचा अभिमान,
उजेडातही वसे अंधार
निसटती क्षण,
हातमूठीतील रेत जशी
मृगजळ, असे ह्रदयी
जाळ्यांचा गुंथ,
अवतीभोवती
सुटते अन् रूजते कधी
विफलता,
रास येई ; निरंतरी .......।।।।।।

......  ज्योती


बेडी



मना-मनातली
अधुरी आस्
जशी जीवाला भास
कळकळूनी सोडवी
माझ्या संगताची
विसंगत
कसे हे ऋण माझे
ओझं बोझं गीळती मन्
कोंडमारा हा राही
ह्रदयातल्या प्राणातं
विसावा घेतो क्षणीक
उफाळून येतं कधी-कधी
आक्रव-तांडव माजवी,
निराशेच्या घेरीत
रोज मरी ही,
प्राणा ची ज्योत
चेतावी की विझावी
याची नाही रीत
ना उमगी ना ही समजी,
ही प्रेमाची प्रीत
आयुष्याच्या बेडीत,
काढती वनवास
याला दुजोरा न मिळे,
ना मिळे आस .......


.... ज्योती

शनिवार, १० जानेवारी, २०१५

क्षणाचं मोल




क्षणाचं मोल

किती सक्त

रिकामपण मनाचं

रिक्त-रिक्त

वजनाचं माप,

ना भरे तोल

किती घटका मोजू याला,

ना समज ना उमग

भरते मी,

चालतं पळतं

पण, ह्रास होतं,

जीवन धन

राहू-केतू येती पाठोपाठ,

हा तुटवडा भरण्यास

अपुरी पडते रातं

दिवस येती-जाती

वाढतच जातं,

मनाची भ्रांत

शमवतं सोडवतं हे निजव्रतं

विश्वासाचा बेडीतं

काढते दिवसं .....।।।।… ,,,,!!!!!!

….ज्योती .



‘’लहानपण देगा देवा ‘’



आजही हवहवसं असतं ते बालपण
आठवे ते बालपण माझे ....
आयुष्याच्या याही उंबरठयावर ,,,,,..... !

राजा-राणीची गाथा ऐकवी आगळी वेगळी
आजोबांची बोली ह्रदयाला भेदी
त्या वृक्ष कडूनिंबाची छाया आठवी
घराच्या मागच्या उंबरठयावर
तासन् तास बसूनि मैत्रीसंगी
थट्टा मस्तीचे ते बोलं,
तो गारव्याचा स्पर्श हळूवार स्मरती जीवाला
मिठूराज कमाल दाखवी
मिठू-मिठू बोल बोलून
मधुरस ओथंबत, माझ्याशी संवाद घालीत
जीवाशिवाची जडली मैत्री जणु
नात्यांनी बाधंली गाठ                                  
मला मानवे ते बालपण
का हिरावले आज
मोठेपणाचा हा दृष्टपणा
न मानवे आज         
मिळेल का पून्हा ते क्षण
मागते मन माझे , वारंवार ...             

 -- - ज्योती


लक्ष्य ....!!!!






मी ठरवित माझे
लक्ष्य, मोजते मापते
कसे असावे कसे भासावे
उचलीत मी
मनाची ताकद
भेदते, माझा जीव
पण, जीव कूठे वसे ,
मेंदूच्या डोक्याचा पिंजरेत ;
शोधते मनाच्या कप्प्यात ;
नजरेच्या डोळ्याचा कोनात ;
माझ्या हाताच्या शिरयात ;
माझ्या मानेच्या मनकेत
 तर नाही
कंबरेच्या कूशीत ;
पायाच्या बोटात ;
कानाच्या कंगोल्यात
नक्कीच दडलेला.
सापडला,
माझ्या नाकेच्या पूडीत,
श्वासधनीच्या घेरयात. ,
कसं शोधू मी लक्ष्य
ठरविले,
देवाला आळणी घालीन
विचारील, कूठे हा जीव,
कूठे हा जीव
वसतो माझा ......!
 …. ज्योती नागपूरकर .

अक्काचं गाणं .....


अक्का म्हणते कशी,
गाणं माझं जीवन
सोनचाफ्याचं गंधासारखं
अक्काचं गाणं कसं सोक्त मनसोक्त
ओठावरचे शब्द
आतल्या आत गीळतं जसं
बेअर्थातून अर्थ अन्
अर्थातून दिृअर्थ
पण अक्का, जमतं कसं
अक्का म्हणते कशी
गाणं माझं जगणं
संध्यातून पहाठ अन्
पहाटेतून रात्रं
गुणगुणं जसं
शब्दाचं रंजन, वाक्याचं भरणं
समजुन उमजून,
स्वताशी गुजंनं
आपल्यातचं रमणं
पण अक्का, जमतं कसं
अक्का म्हणते कशी
गाणं माझं मनं
जसं कोकीळेची साद
गोड मधूर स्वर
ईश्वर दिसे त्यातं
आत्मदर्शन माझं
पण अक्का, जमतं कसं
अक्का म्हणते कशी
गाणं माझं भरणं
शेवटचा श्वासापर्यंत
आत्ताचा क्षणापासनं
कधी येतं उल्हास,
थकवाचं ओझं
भरतं पण रिझतं
नातं कधी रूसतं,
कधी संजवतं
गती संथ पण,
उमलतं माझं मन
पण अक्का, असं कसं
अक्का म्हणते कशी
गाणं माझं दर्शनी-विश्व .......
... ज्योती


मायेची कूशी .....


आई ची कूशी
माझ्या मनाची शिदोरी
सुख-दुखाचा,
ओझं बोझं भरी
थपकून दिलासा देतं,
निजले उदासी मनं
सात्वंन घाली ; देती पाठ,
मज शिकवणीचं
बांध भरले रिकामपणं
गंध हा हवाहवासा,
माय-ममतेचा
ओंजळीने घाली,
स्नेह भेट
तिच्या ह्दयी असे ;
अमृत घडा
अशी कूशी जी ;
तेवतं सतत् ,
माझं ; सृजनशील ..... ...।।।। ....,,,,

,, ... ज्योती




स्त्रीचं मन हे मोरपिसारा फुलवून मोकळ्या बागेत स्वच्छंद होवून थुईथुई नाचतो तस असतं कारण तिलाही असच काहीतरी करावसं वाटतं .....






... ज्योती

कोंडमारा मनाचा ….



गोंगाट गोंगाट
वाजा गाजा
पसरला हवेत
विचलीत होतं,
मनाची सोसं
न थांबे हा ध्वनीरथं
जिथं जावं तिथं
पाठलाग करी
धावा-धाव करी
होतं मनाचा कोंडमारा
रस्त्यावरचा पोंगा
पडे छातीवर धोंडा
वाटले, लगन-समारंभ
गोड वाटे मनरंजन
टवकरले तिथं कंगोरे
मार पडे कानपटावर
कर्कश करी गर्दीची साथ
सूर-बेसूर आवाज
डोक्याचा शिरया ताणवी
मागती मन शांती
 पण दिसे ती
अदृश्य होवून
इशारा एक मिळे
एकांत धुंडे
सागरयाची लहरी
उदंड माजवी तरी,
रास आले मनी
वाटे, शांतीचा हा सागर
देईल गोडव्याचा सार
आत्ताला सोसवेल मी,
आनंदाचा भार ......,, ,, !!

.... ज्योती