पाखरं मन
पाखरं मन
मन
कसं पाखरं ;
भिरभिरतं
उडतं अन् थकतं
तृष्णा
ही मृगतृष्णा
झाली,
जिव्हाळा लागी
दुज
जीवाला
हाक
देत संत्सगाची
सोबत
मिळे ती,
दुर्जनाची
गत
छेडीत
आसवे मनाची
दिसे
ना ते दूर दूर
ह्रदयी
भेदी
तो
राजसी मोह
अनावर
झालं
पण
जवळ साधी
कळले
वळले क्षणभर
असं
कसं हे पाखरं, मन
नको
नको म्हणतं ....
..... ज्योती