भावसरी
या क्षणातून मी आनंदले
काय वाटले, मला न कळले
अरे ! जाणावे न असे
या माझ्या आगोश्यात
काही तरी नवीनच घडले
शहारलेल्या अंगावर जणू
दवबिंदू पडले,
बघुनी हे माझ्या डोळ्यानी
ओजंळीत मी धरले
भरभरूनि साडांवे असे
मला न कळले
बघता-बघता मी चिंब झाले
पावस सरीने मला घेरले
या स्पर्शाचा, या धूदींत
जाणले, सावळ्या ढगांचा
पाशात मी अडकले,
पण; मला न कळले
जाग येताच ताडकन्
उठले,
स्वप्नातल्या
या भावसरीत जणु
मी; न्हावूनच आले ....
...... ज्योती
