गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

सूस्वर संगीत ....

सूस्वर संगीत
सांज सकाळी
रंग इंद्रधनुष्याचे भरती
सप्त सूर बांधे
जीवनसार
जे भेदी,
उरी आनंद भरी
निर्मळ उज्वल होती,
मनाची व्यथा
उदास भाव,
क्षणभर निरसे
उल्हास देती सोज्वळ
काय हि जादू, या स्वरात
लागी गोडी
शब्द सुरात
प्रेम संदेश देती
जीवन भेद दर्शवी
मोह भरी आनंद भरी
जणु प्रकाशी
प्राण ज्योती .......

 ..... ज्योती