गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

मी मैत्री ज्योती .....

निष्पाप  जळती,  वणव्यातं
हसी  नियती,  परिसरात
कपट नीती भरती  तीर,  सुरीतं
माजते,  रानटी  मन
रूजते , गीधळ
टोचते,  राजकारणी  खेळ
गुन्हाची करणी,  दाखवते  विकृती
जनात मिरवीत,  अवगुणी
ठेवतं  लाचारी,  तोंडावर बोट
दिसत अशिस्तीत , शिजलेली  जळकट .......

ज्योती  नागपूरकर

सोमवार, २५ मे, २०१५

ऊन्हाळी फुलराणी ….

फूलला एक चाफा
मनात चाहुल लागली
गंधाच्या सुवासाची
अन् अंगणात पडले
चाफ्यांचे सडे
जसे कुणी मोती शिंपडावे
मोगरयाची धूंद लागली
गजरा सजला केसात
चाफा मोगरा जणु
बहिणी-बहिणी
जणु सागंत ,
आम्ही उन्हाळी फुलराणी
पण त्यांचात,
सुवासाची लागली ओढ ;
विचारी ,
आमच्यात गं कोण
सुवासिनी ;
जी तूलास देती
सुगंधाची मोहीनी
मी म्हणाले, 
दोघीही सारखे मला
आनंदाचा गंध, मनाचा सुगंध
जे, मदमोह करती मला .. ! ..

.... ज्योती 


शुक्रवार, २० मार्च, २०१५


गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५

भावसरी या क्षणातून मी आनंदले काय वाटले, मला न कळले 

अरे ! जाणावे न असे या माझ्या आगोश्यात काही तरी नवीनच घडले 

शहारलेल्या अंगावर जणू दवबिंदू पडले, 

बघुनी हे माझ्या डोळ्यानी ओजंळीत मी धरले 

भरभरूनि साडांवे असे मला न कळले 

बघता-बघता मी चिंब झाले पावस सरीने मला घेरले 

या स्पर्शाचा, या धूदींत जाणले, सावळ्या ढगांचा पाशात मी अडकले, 

पण; मला न कळले जाग येताच ताडकन् उठले, 

स्वप्नातल्या या भावसरीत जणु मी; न्हावूनच आले .... 

...... ज्योती 

 

भावसरी



या क्षणातून मी आनंदले
काय वाटले, मला न कळले
अरे ! जाणावे न असे
या माझ्या आगोश्यात
काही तरी नवीनच घडले
शहारलेल्या अंगावर जणू
दवबिंदू पडले,
बघुनी हे माझ्या डोळ्यानी
ओजंळीत मी धरले
भरभरूनि साडांवे असे
मला न कळले
बघता-बघता मी चिंब झाले
पावस सरीने मला घेरले
या स्पर्शाचा, या धूदींत
जाणले, सावळ्या ढगांचा
पाशात मी अडकले,
पण; मला न कळले
जाग येताच ताडकन्
उठले, स्वप्नातल्या
या भावसरीत जणु
मी; न्हावूनच आले ....   


...... ज्योती 

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०१५