सोमवार, २५ मे, २०१५

ऊन्हाळी फुलराणी ….

फूलला एक चाफा
मनात चाहुल लागली
गंधाच्या सुवासाची
अन् अंगणात पडले
चाफ्यांचे सडे
जसे कुणी मोती शिंपडावे
मोगरयाची धूंद लागली
गजरा सजला केसात
चाफा मोगरा जणु
बहिणी-बहिणी
जणु सागंत ,
आम्ही उन्हाळी फुलराणी
पण त्यांचात,
सुवासाची लागली ओढ ;
विचारी ,
आमच्यात गं कोण
सुवासिनी ;
जी तूलास देती
सुगंधाची मोहीनी
मी म्हणाले, 
दोघीही सारखे मला
आनंदाचा गंध, मनाचा सुगंध
जे, मदमोह करती मला .. ! ..

.... ज्योती